STORYMIRROR

मधुराणी थळे

Tragedy Others

3  

मधुराणी थळे

Tragedy Others

काय चूक होती?

काय चूक होती?

1 min
11.9K

काय चूक होती त्यांची ? की त्यांना प्राण गमवावे लागले,

भारतमातेचं रक्षण करताना रक्त सांडावे लागले.

काय चूक होती ? त्यांची की त्यांच्यावर जीवघेणा हल्ला व्हावा,

बाबा घरी कधी येणार म्हणून मुलाने हुंदका द्यावा.

काय चूक होती त्यांची ? ते देशा साठी लढत होते.

स्वतःचा संसार बाजूला सारून इतरांचे संसार सुखी करत होते.

काय चूक होती त्यांची ? ते घरी परतण्याची वाट पाहत होते,

त्यांना तरी काय माहित ? घरी त्यांचे पार्थिव जाणार होते.

काय चूक होती त्यांची ? ज्यांना कपाळावरचे कुंकू पुसावे लागले.

लग्नात भरलेल्या हिरव्या चुड्याचे तुकडे-तुकडे करावे लागले.

काय चूक होती त्यांची ? त्यांना देशासाठी जगायचं होतं,

हृदयाच्या शेवटच्या ठोक्यात फक्त ‘जय हिंद’ म्हणायचं होतं.

काय चूक होती त्यांची ? ज्यांनी अश्रू गाळले,

देशासाठी शहीद होऊन आपले जवान अमर झाले.

काय चूक होती त्यांची ? की नियती ने असे करावे, 

ज्यांच्या मुळे देशाचं आयुष्य आहे त्यांनाच दूर न्यावे.

काय चूक होती त्यांची ? त्यांनी भारतमातेवर प्रेम केलं,

प्रेमासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करून आईलाच पोरकं केलं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy