माणुसकीचा निचांक
माणुसकीचा निचांक


एक नारी निघाली ऑफीसमधूनी
रात्र फार हो झाली होती
लख्ख चांदण्यांचा प्रकाश
अन् भयाण शांतता होती...
काही नराधमांचा वावर होता
तो ही जनावरांच्याच मस्तीत
काढला माग त्या नारीचा
धुंद-बेधुंद त्या काळ रात्रीत...
चेव चढला, भावना अनावर झाल्या
ताकदीतही फरक हो नराधमांच्या
गेले तिच्यावर धावून, ओरबाडू लागले
टाहो विरला हो तोंडी त्याच नारीच्या...
आक्रोश केला गगनी उमटला
झोपली होती दुनिया गाढ स्वप्नात
नारीची हाक, आक्रोश, टाहो सारे
दबत होते तिच्याच हो हुंदक्यात...
काही रात्रपाळीला होते चाललेले
काही रात्रपाळीहून होते आलेले
नुसतीच बघ्याची भूमिका सार्यांची होती
अहो, माणुसकी पार संपलेली होती...
अहो माणुसकी पार संपलेली होती...