आहे का मुलगी सुरक्षित
आहे का मुलगी सुरक्षित
रोज होतायेत बलात्कार
आहे का मुलगी सुरक्षित?
कुठे जाळणं व पळवणं
जरी युवक असला शिक्षित...!!
किती माजलेत नराधम
कशा मुली सुरक्षित?
जिकडे तिकडे स्वैराचार
रोज एक ठरतेय भक्षित....!!
लेक वाचवा लेक शिकवा
फक्त कोऱ्या कागदांवर
कधी जागणार शासन
मोकाट फिरतायेत जनावरं....!!
कडक असा कायदा करा
द्यावी नराधमास फाशी
आसिफा, प्रियंका, प्राध्यापिका
निर्भया, कोपर्डी, नांदेडची बालिका...!!
शापित वाटतोय जन्म मुलीचा
अल्पवयीन मुलीला धोका
टपून बसतोय गिधाड तो
शोधत असतो फक्त मौका.....!!
तुम्हीच आता जनलोकहो
उठा आणि जागे व्हा
होता अन्याय, अत्याचार
ठेचून काढण्यासाठी पुढे व्हा....!!
अजून निर्भया वाट बघतेय
न्याय मागते या जगाला
सात वर्षे उलटून गेली
शांती नाही ना मनाला.....!!