अन्नच्या शोधात निघाली
अन्नच्या शोधात निघाली
अन्नाच्या शोधात निघाली
जंगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!
गावात वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल काहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!
फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
तोंडाला जिभेला इजा
लागली भयानक व्हायला....!
कुणालाही काही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!
भाजलेली सोंड बुडवून
उभी राहिली थोडीशी
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!
तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या
बाळाला काही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतःला.....!
नदीजवळ माणसं
पाहू लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावून
देणारं नाही माझ्या
बाळाला....!
काळीमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ
नाही करणार अशा
वृत्तीला.....!