STORYMIRROR

sandeeep kajale

Crime

4  

sandeeep kajale

Crime

ती फुलराणी

ती फुलराणी

1 min
472

ती फुलांच्या झुल्यावर झुलत होती

स्वप्नांच्या हिंदोळ्यांवर फुलत होती


नवे स्वप्न, नवे जीवन, नवी आशा

जगण्याच्या वळणाला दिली नवी दिशा


कुणा एका ओळखीतल्यानेच, केला घात

दुःखद क्षणांनी, तिच्या सुखावरच केली मात


आगीचा लोळ, फेकला तिच्या अंगावर

केशरी ज्वाळांनी, घेर धरला गोऱ्या रंगावर


अवघा आसमंत हादरला, तिच्या किंचाळ्यांनी

वेदनेचा एकच कल्लोळ बघितला, सगळ्यांनी


जीवनाच्या आकांताने ती विव्हळली

अवघी स्त्री जाती आता कळवळली


लढा सुरु होता तिचा जीवन-मरणाशी

माहित नव्हते, शेवटी यावे लागेल सरणाशी


अनेकांनी मागितल्या, दर्जेत दुवा

प्रार्थनांनी, त्या परमेश्वराशी खेळा जुआ


वाटत होते, यातून निघेल काही अर्थ

अनेक प्रयत्नांनीही, वाटत होते सगळे व्यर्थ


उपचार होत होते, त्यावरच होती भिस्त

न ठाऊक नव्हते, तो देवही घेईल शिकस्त


क्षणांत सगळा तिचा आनंद झिजला

आशा-अपेक्षांचा दिवा आता विझला


जीवनाची झुंज ठरली अपयशी

मनी ना ध्यानी, ही नियती कशी


अवघ्या जनतेने केला आक्रोश

आक्रमकतेचा होता त्यांच्यात जोश


तिच्या चितेला जड मनाने दिला अग्नी

धुराचा कल्लोळ पसरला गगनी


अत्यंत दुर्दैवी, अशी तिची कहाणी

सगळ्यांची होती लाडकी, झाली ती फुलराणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime