STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy Crime

3  

Kishor Zote

Tragedy Crime

बलात्कारे

बलात्कारे

1 min
30

डोक्यात घोळतसे

लैंगिकतेचे विचार

तसेच आचरण

घडतसे.........


लैंगिक शोषण

चौथीच्या मुलींचे

गुरु स्थानी कसे

बसवते..........


चांगले जेवण 

देतसे आमिष

शरीराची भूक

भागवते.......


आश्रम ती शाळा

विद्येचं मंदिर

लैंगिकतेचे शोषण

गाठीतसे.........


स्त्री-पुरुष दोघेही

सामील सारेच

दोष द्यावा कोणा

कळेनासे........


ज्ञान तेथे मान

सांगती सुजाण

नागडी नग्नता

विवस्त्रते........


अशा सैतानांना

द्यावी काय शिक्षा

दोरीचा तो फास

शरमतसे.........


कोणती ती जात

कोणता तो धर्म

सभ्यतेची लक्तरे

लटकते.........


आजही स्त्री फक्त

भोग वस्तूच असे

असे कसे आचार

विचारते...........


दुसरे आई-बाबाच

भरवसा खऱ्यांचा

विश्वासघातकी करी

बलात्कारे...........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy