माझा होशील का?
माझा होशील का?
जीवनातील अनेक क्षण
मोहून टाकण्यासाठी
एकमेकांशी बांधू या
जन्माच्या, अनंत गाठी
तुझा हात हातात
असाच राहावा
आयुष्याचा पट
एकत्रित पाहावा
ओढ नेहमी लागावी
तुझी, जन्मांतरीची
वाट सतत पाहावी
अनामिक अंतरीची
वाटते फिरुनी यावे
त्याच वाटेवर पुन्हा
जेथे सोडिल्या आपण
आपल्या मिलनाच्या खुणा
काही आठवणी होत
जातील, अशाच जुन्या
ना रहावो, मनातील
प्रेमाच्या जागा सुन्या
बोल ना रे, ऐ संख्या,
तुझ्या विना कशी राहू
तूच माझा सांगाती
चल अवघे जग पाहू
एक विचारू तुला, सारे
माझ्यासाठी सोसशील का?
जिवलगा, सांग ना, एकदा,
माझा होशील का ?
