फ्रिज मध्ये ठेवलेला गुलाब
फ्रिज मध्ये ठेवलेला गुलाब
काल त्याने तिच्यासाठी
आठवण म्हणून आणला
प्रेमाच्या घट्ट नात्यांमध्ये
ओवून सुंदरपणे विणला
कामाच्या नादात तो
तिला विसरला द्यायचा
राहून गेला प्रियतमेचा
प्रतिसाद घायचा
दिवसभर तो बिचारा
कसा झाला, ते विचारा
थंडीने त्याचे कुडकुडके अंग
सुकून जाऊ लागला, उडाला रंग
असे कसे घडले, विचार केला त्याने
तो कसा विसरला, आणले मला ज्याने
दिस सरला, चढला रंग निशेचा
तोल धरला, हात ना सोडिला आशेचा
अचानक त्याला आठवले, तो गहिवरला
झाल्या प्रकाराने तो सुद्धा जरासा खिजला
त्याने मला पाहण्यासाठी, दार उघडले
थंडीमुळे माझे सगळे अंग बिघडले
त्याने फक्त दुःखच केले व्यक्त
कोरडाच राहिला, हात होते रिक्त
आपल्या प्रियसीला, कसे सांगावे
आपल्या नाजूक धाग्यात कसे बांधावे
मला तेथेच सोडून तो पसार झाला
माझ्या मनाचा कप्पा, अश्रूत न्हाला
अखंड रात्र मी होतो त्या गारव्यातच
पण त्यांचे प्रेम फुलून आले, ऐन मारव्यातच
नवीन फुल त्याने तिच्या पुढ्यात टाकले
मला मात्र, दुसऱ्या सकाळी, केरात फेकले
अशी माझी जीवन कहाणी आहे जनाब
कोण मी? काय विचारता............
मी..... मी...... मी आहे, फ्रिज मध्ये ठेवलेला गुलाब

