काही रेंगाळलेले क्षण
काही रेंगाळलेले क्षण
1 min
359
भटकत होतो अनामिक एकटा
शोधत राहिलो किती, अनवट वाटा
अनेक प्रश्नांनी मन दाटले
उत्तरे आपसुकचं, मिळतील वाटले
चालताच राहिलो, होता अनोळखी रस्ता
सुख शोधण्याच्या नादात, सोसल्या खस्ता
एका टप्प्यावर होता, देठा आठवणींचा
अनेक गोष्टी दडल्या, होता मार्ग साठवणींचा
थोडे थांबावेसे वाटले, हाती होता वेळ
विचारांच्या गोफात, जुळत नव्हता मेळ
वाटे त्यांना, हातात घट्ट धरावे
गत जीवनाला, आनंदाने स्मरावे
नाही ताब्यात राहिले, माझे घरंगळलेले मन
तसेच पडून आहे आता, काही रेंगाळलेले क्षण
