कोणते नाते म्हणू हे...
कोणते नाते म्हणू हे...
कधी वाटते
उडावे वाऱ्यावरती
कधी भासते
दव फुलांवरती
बदलते अवघे
विश्व सारे
वाहती अलवार
स्वप्नांचे वारे
व्यक्त नाही होत
नेहमीच शब्दांतून
आपल्यालाच उमगते
दिसते फक्त डोळ्यांतून
बनते आनंदाचे डोही
आणि आनंद तरंग
नभी उडत राहतो
अनपेक्षित स्वप्नविहंग
अवघे जीवन
वाटते त्याला अर्पावे
कुणाच्याच वाईट दृष्टीने
कधीच ना कार्पावें
रुजावे पूर्णपणे त्याच्यामध्येच
सोपवून त्याला सर्वस्वी
त्याच्याच कुशीत मिटावे
वाटत राहावे मनस्वी
काय म्हणू मी याला
नाव काय द्यावे
असे हे अवघड कोडे
काय उत्तर, त्याकडून घ्यावे
आयष्यभर असेच राहावे
वाटते प्रेम जणू हे
एक अनामिक ओढ ही
कोणते नाते म्हणू हे

