STORYMIRROR

sandeeep kajale

Others

4  

sandeeep kajale

Others

केशरी कवित्व

केशरी कवित्व

1 min
406

दिवस सरला

आली संध्या छाया

घटिका आनंदाची

उजळली अवघी काया


सोनेरी रंगात न्हाले

मनमोहक गगन सर्व

वेगळी कहाणी वर्णिली

रंगले अवघे सांजपर्व


पक्ष्यांनी वाट धरिली

निघाले आपुल्या घरट्याकडे

पाचोळाही विसावला

धरतीवर पसरले सोनसडे


पानांची सळसळ थांबली

शांत झाली अवघी गर्द हिरवी

आपल्या रंगावर पांघरलेली

सोनेरी शाल मिरवी


सूर्य झुकला मावळतीकडे

किरणांनाही बघितला अस्त

रात्र चाहूल देऊ लागली

रातकिड्यांची वाढली गस्त


या कातरवेळी, पसरला

सृष्टीचा अनोखा रंग

आपले अस्तित्व विसरत

त्या तेजस्वने चोरले अंग


अवघ्या जीवनाचा महिमा

सांगे, असे हे ममत्व

निशेच्या गर्भात, उद्याचा उष:काल

शब्दांत गुंफले, केशरी कवित्व


Rate this content
Log in