गुंतणे ना टळते
गुंतणे ना टळते
मनाच्या खोल तळाशी रुतून राहावे
असंख्य आठवणींनी काळीज जळते
जीवनाच्या अनंत वेदनांना सहावे
नव्या वळणांवर, आयुष्य हे वळते
त्या प्रेमळ क्षणांना एकदा विसरून पाहावे
पण, हृदयाच्या कप्प्यात ते हळहळते
आपले समर्पण समजून ते जगावे
ठेच लागल्यापरि, त्रासाने मात्र कळवळते
वाटते, ते प्रेम, काही काळच उरावे
तोडण्याचा प्रयत्न केला तरी, धागे जुळते
आपल्यापासून त्याला कायमचे विभक्त करावे
मोहांमध्ये अडकून, तरीही आपल्यामध्येच रुळते
जगाच्या मापात अवघे सुख भरावे
हे शक्य नाही, हे सुद्धा कळते
विरहाचे ढग, आता कसे सरावे
आपण एकत्र नाही, तरीही...
तुझ्यात गुंतणे ना टळते
