STORYMIRROR

sandeeep kajale

Romance Others

3  

sandeeep kajale

Romance Others

हे धुंद चांदणे

हे धुंद चांदणे

1 min
326

नभी उगवला चंद्र असा

निशेचा रंग निळा जसा


झाडांची पानेही निजली

निद्रेच्या गर्तेत अवनी भिजली


सारा माहोल वाटे कसा शांत

शितल छायेत रात्रीची उजळली कांत


नयन, नायानांशी जणू जडले

मिठीत येण्यास दोन तन भिडले


तिला काहीतरी सांगायचे होते

शांत ओठ तिचे, हात सुद्धा रिते


काहूर दाटून आले तिच्या मनी

जणू, धरती शहारली भेटीस गगनी


श्वासांचा अनोखा दरवळे येथे रंग

प्रणयांचे क्षण असोत आपल्या संग


गात राहावे वाटते, हे मंद गाणे

ते सखे, बघ, क्षितिजी दाटले............

................ हे धुंद चांदणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance