STORYMIRROR

sandeeep kajale

Others

3  

sandeeep kajale

Others

खिडकी

खिडकी

1 min
309

एक मनोहर झुळूक सुगंधाची

येई जेथून अगदी अलवार


कप्पा, बंद आठवणींचा

उलगडी जी, हळुवार


जी देते, जगण्याचीच आशा

बोलती, नेहमीचं स्वप्नांची भाषा


अशी जागा, जेथे व्हावे निवांत

मनात रुंजी घालतात, विचार शांत


मिळते, इथेच क्षणभर विश्रांती

आनंद मिळतो, जेथे दिवसांती


आपलाचं आपल्याशी संवाद घडतो

मळभ दूर होऊन, गत जीवनाशी जोडतो


अएकांतात विणते अनंत प्रेमाचे धागे

रोजची धावपळ, आपसूकच पडती मागे


कायमचं, आजच्या आर्थिक युगात

जपून ठेवी आपल्या भावनांची खिडकी 


नेहमीच उघडून, बसावे येथे सुखात

अशी हि छोटीशी, पण मोठी खिडकी



Rate this content
Log in