चार क्षण
चार क्षण
तुझ्या पांढऱ्याशुभ्र डोळ्यांमध्ये चंद्र दिसावे,
हिऱ्याप्रमानेच तुझ्या नाकातील नथ चमकावे,
अंधाऱ्या रात्रीसुध्दा तुझा चेहरा मला दिसावे,
आणि चार क्षण का होईना तुझ्या सोबत जगावे.
चालता चालता तुझ्या पायातील पैंजन वाजावे,
त्या नाजुक अशा पुष्पा प्रमाने तुझे रंग निखरावे,
चंद्र आभाळाच्या प्रेमाप्रमाने तु माझ्याकडे पहावे,
आणि चार क्षण का होईना तुझ्या सोबत जगावे.
स्वयंपाक घरात बसुन शिट्ट्या मोजावे,
तुझ्यासोबत चपाती पोळी सुध्दा लाटावे,
जात्यावरती ओव्या म्हणत धान्य देखील दळावे,
आणि चार क्षण का होईना तुझ्या सोबत जगावे.
भिंतीवरच्या अनेक आठवणी तेथेच वाढावे,
एका दवबिंदू सारखे तेखेच त्या लटकावे,
माझ्या प्रेमाचे त्यावरती गंज चढावे,
आणि चार क्षण का होईना तुझ्या सोबत जगावे.
तुझ्या सौदर्यांचे खुप कौतुक करावे,
तुझ्यावरती एका पेक्षा एक चारोळ्या रचावे,
तुझ्यावरती कविता नव्हे तर काव्यसंग्रहच लिहावे,
आणि चार क्षण का होईना तुझ्या सोबत जगावे.
तुझ्यासोबतच माझे सर्व स्वप्न पुर्ण करावे,
वाटेवरती चालताना तुझा हात धरावे,
घड्याळ्यातल्या काट्याप्रमाने ह्रदय माझे धडकावे,
आणि चार क्षण का होईना तुझ्या सोबत जगावे.