प्रेमाची अग्निपरिक्षा
प्रेमाची अग्निपरिक्षा
💞पहिल्या पावसाचे जोरदार कोसळन l
माझे ते मनसोक्त भिजणं l
त्याचे माझ्या आयुष्यात अचानक येणं l💞
💞प्रेमात एकमेकांत जीवापाड भिजणं l
भेटीत गुलाबी त्याने मखमली साडी देणं l
मोत्याचे झुमके आणि बांगड्या देणं l💞
💞सजून धजून माझं दुल्हन होण l
देवळात आमचं लग्न होन l
सात जन्माची वचने घेण l💞
💞घरभर मोगऱ्याचा सुगंध पसरवण l
पलंगावर गुलाबाच्या पाकळ्यांचे सजन l
पहिल्या रात्री माझं सर्वस्व अर्पण करणं l💞
💞रोज त्याच्या प्रेमात मिठीत बिलगून राहणं l
त्याच्या प्रेमाच्या पावसात चिंब भिजणं l
पलंगावर तिथे माझे स्त्रीत्व उधळण l💞
💞एक वर्षासाठी त्याचं ते परदेशात जाण l
तो येण्याच्या वेळेस पहिल्यांदा भेटलो तिथेच मी उभे राहावं ठरण l
तीच गुलाबी साडी कानातले बांगड्या घालणं l
दुल्हनच्या कपड्यातच सजून उभे राहण l💞
💞ठरलं एक वेगळी प्रेमाची अग्नीपरिक्षा देणं l
पुन्हा तसेच पहिल्यांदा भेटल्या सारखे भेटणं l
पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडणं l💞
💞मला सोडून त्याचे ते परदेशी जाण l
नंतर कळण त्याचा माझ्या पोटात आंकुर आसन l
एक वेगळेच माझं नव्याने पुन्हा जगणं l💞
💞विरहात त्याच्या तडफडत रडणं l
त्याच्या भेट वस्तूंना घेऊन कुरवाळण l
पलंगावर त्याच्या आठवणित रमण l💞
💞आमच्या प्रेमाच्या अंकुराच फुटन बाहेर येणं l
त्याच्यात त्याचा भास सतत मी शोधणं l
हे माझ्याकडून मोठा गिफ्ट आल्यावर ठरवल त्याला देणं l💞
💞त्याच्या येण्याचा तो दिवस येणं l
पावसाचेही तेव्हा तसंच जोरदार पडणं l
भेटीसाठी माझा जीवाच कासावीस होण l💞
💞दुल्हन सारख सजून दरपणात स्वतःला न्याहाळणे नव्यानं l
घर भर सुगंध दरवळत मोगरा ठेवणं l
पलंगावर गुलाबाच्या पाकळ्यांची मखमली चादर पसरवन l💞
💞बाळाला शेजारी ठेवून माझ धावत त्या जागेवर जान l
दुलहन बनून पावसात चिंब होऊन माझं ते तिथे उभ राहण l
आतुर होऊन वाटेकडे डोळे लाऊन बघणं l💞
💞समोरून एक मोठ्या गाडीचे येण l
एक श्रीमंत माणूसाचे त्यातून उतरण l
त्याचे वेगळेच रूप समोर मला दिसणं l💞
💞माझं जिवाच्या आकांताने त्याच्याकडे धावणं l
पण तितक्यात गाडीतून ऐका दुसर्या मुलीला मी उतरताना बघणं l
माझे एकदम पुतळा होऊन तिथे थांबणं l💞
💞तशाच गुलाबी रंगाच्या साडीत तीच नटन l
तसेच मोत्याचे कानातले तशाच बंगड्यांत सजन l
माझं प्रतिबिंब बघतेय असं भासन l💞
💞चेहरा मात्र दुसरा होता ते कळण l
तिच्या पोटात अंकुर आहे हे दिसणे l
त्याने माझी येऊन प्रामाणिक पणें माफी मागणं l💞
💞त्याला अग्नीपरिक्षा देता नाही आली आसे सांगणं l
त्याने लग्न केलं तिच्याशी हे बोलणं l
तिच्याबरोबरच कायमचा तिकडे राहणार हे सांगणं l💞
💞माझ्या तोंडातून काहीच शब्द न फुटण l
माझं त्यांच्याकडे सुन्न होऊन फक्त शांत बघत राहणं l
त्याचं ते गाडीत बसून सरळ निघून जाणं l💞
💞जिवाच्या आकांताने ते माझं रडणं ओरडणं l
पावसात माझं ते खाली कोसळन l
स्वतः स्वतःला सावरून उभे राहून सांभाळणं l💞
💞पावलांचं बाळासाठी घराकडे परत फिरन l
त्याला कुशीत घेऊन ओक्साबोक्शी रडन l
दिवाना वरती ना जिवंत ना मेलेल्या गत निजन l💞
💞मनाचे चालू होते हजार प्रश्न स्वतःलाच विचारानं l
उत्तरांचा शोध सुरू होता पण एकही सपडत नव्हतं संपत नव्हते शोधणं l
कळतच नव्हतं ठरलेल्या प्रेमाच्या अग्नी परीक्षेत मी पास की नापास माझ होण ll

