Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankita Kulkarni

Others

4  

Ankita Kulkarni

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
362


न उलगडणारं कोडं,

न सुटलेलं गणित


आयुष्यात काय कमावलं आणि काय,

गमावलं कधी कोडंच नाही उलगडलंl


आयुष्याचं अधिक आणि वजा,

कधी गणितच नाही सोडवलंl


जन्मापासून लग्नापर्यंत आई-बाबांनी,

मला नाजूक फुलाप्रमाणे वाढवलंl


त्यांच्या प्रेमाच्या छायेखाली,

माझं बालपण मी मजेत घालवलंl


त्यांनी माझे लग्न लावून मला,

त्यांच्यापासून खूप दूर दूर पाठवलl


त्यांच्याबरोबर राहण्याचं,

माझं सुंदर स्वप्नच हरवलंl


फक्त प्रेमाचा सागर होता,

माझं ते माहेरच दुरावलंl


सासरच्या नव्या वाटेवर,

मी स्वतःच स्वतःला सावरलंl


स्त्रीत्व मिळाल्यावर पुन्हा,

नव्याने जन्मल्यागत मला भासलंl


मागे सोडलेल्या दुःखाला,

या सुखाच्या झालरीने लपवलंl


संसारात हळूहळू मन,

की माझे मग रमत गेलंl


नवऱ्याला शेवटपर्यंत साथ,

द्यायचं असंच होतं माझं ठरलंl


मातृत्व मिळाल्यावर मला,

मायेचं, ममतेचं पाझर फुटलंl


तेव्हा माझ्यासाठी कळणारं,

आई-बाबांचं मन मला कळलंl


मुलांना मोठं करताना आई-बाबांचं,

प्रेम सतत डोळ्यासमोर ठेवलंl


त्याप्रमाणेच मुलांना पण,

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंl


मुलीला मोठं करून तिचं,

लग्न करून तिला सासरी पाठवलंl


माझ्या शरीरातून कोणी काळीज,

काढून नेल्यागत मला भासलंl


रोज अवतीभवती असणारी,

दिसेना मन दुःखाने गलबलंl


तेव्हा माझ्यासाठी तुटणारं

आई-बाबांचं काळीज मला उमगलंl


मुलाचे लग्न करून सून,

मुलगी मानून घरात मी तिला आणलंl


प्रेमात वाटेकरी होऊन मुलगा,

दुरावला, मग मन खूप दुखावलंl


आई-बाबांचं एकेक करून,

प्रेमाचे माझे छत्र मग गळालंl


नातवंडांच्या येण्याने पुन्हा त्या दुःखाला,

या सुखाच्या झालरीने लपवलंl


आयुष्याचा जोडीदार सोबत पण,

एकटेपणाने मला खूप सतावलंl


म्हातारपण ही शेवटची अवस्था,

हे सत्य प्रखरतेने जाणवलंl


झाडाच्या पिकल्या पानाप्रमाणे,

म्हातारपण मन दुःखाने हादरलंl


कोण आधी गळणार, नुसते या,

कल्पनेनेच काळीज अगदी थरारलंl


यांच्याआधी मला मरण असे,

लग्नात सात फेरे घेताना बजावलंl


तरीपण यांनाच अाधी नेऊन,

नियतीने हो मला फसवलंl


एकटेपणाचे भूत मग माझ्या,

मानगुटीवर रोज येऊन बसलंl


जन्म एकट्याने मरण एकट्याने,

हेच वास्तव मग स्वतःच मी स्वतःला पटवलंl


खरंच आयुष्यात काय कमावलं,

आणि काय गमावलं कधी कोडंच नाही उलगडलंl


आयुष्याचं अधिक आणि वजा,

कधी गणितच नाही हो सोडवलंll


Rate this content
Log in