Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankita Kulkarni

Others

4  

Ankita Kulkarni

Others

मुलगी

मुलगी

1 min
486


महिला दिनाचा सर्व स्त्रियांना आदराने मानाचा मुजराl


मुलगी नको, मुलगी नको अशी,

बऱ्याच जणांची समजूत का असते?


ती नसली तर जन्म कोठून,

हे सत्य नाकारले का बरे जाते?


जन्मापासून मृत्यूपर्यंतही,

अनेक रूपात आपल्याला ही दिसते।


जन्म झाल्यावर लक्ष्मी आली,

ही छोटीशी घरची कुमारिका असते।


आई-बाबांच्या प्रेमात वाढलेली ती,

ही घराची लाडकी खरी लेक असते।


लग्न करून सासरी पाठवताना,

ही माहेरच्या संस्काराची खरी ठेव असते।


सासरी घरात पहिले पाऊल,

टाकताना ही घरची खरी लक्ष्मी असते।


सर्वांना आपलंसं करून नांदणारी,

ही घराची खरी गृहलक्ष्मी असते।


नवऱ्याबरोबर एकांतात त्याची,

ही प्रेयसी, खरी सखी असते।


सासू-सासरे यांना आई-बाबांचा,

मान देणारी घराची खरी सून असते।


मुलांना जन्म देऊन, मुलांचे, नातवंडांचे,

सुख सर्वांना देणारी ही प्रेमळ आई असते।


मुलांना मायेच्या पदराखाली सांभाळणारी,

ही माया ममतेचा खरा, मोठा सागर असते।


मुलांना चांगले संस्कार, चांगली विद्या,

देणारी घराची सरस्वती खरी असते।


मोठं होताना चांगले मार्ग दाखवून,

त्यांच्यासोबत राहणारी त्यांची मैत्रीण असते।


मुलीचे लग्न लावून आपल्या काळजाचा,

तुकडा देणारी ही खरी विहिन असते।


मुलीचे लग्न करून नवीन सुनेला,

मुलगी मानून आणणारी सासू असते।


मुलांना नातवंड झाल्यावर त्यांची,

हौस मौज पुरवणारी ही प्रेमळ आजी असते।


मरणानंतर पण सर्वांच्या मनात काळजात,

घर करून ही उरते अशी माया, ममता, प्रेम यांचा ही ठसा असते।


जन्मापासून मृत्यूपर्यंत अशा अनेक,

रूपात आपल्याला दिसते ही मुलगीच असते।


मुलगी पण हवी, मुलगी पण हवी अशी,

सर्वांची इच्छा हवी खरी असे मला वाटते।


ही आहे तर त्या विश्वात माणसांचा,

वावर आहे हे खरे सत्य मला उमगते।


Rate this content
Log in