STORYMIRROR

Ankita Kulkarni

Others

4  

Ankita Kulkarni

Others

मैत्री

मैत्री

1 min
373

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

हवीच, जिची गरज भासते,

असे गोड नात म्हणजे मैत्री,

अशी हवी ही गोड मैत्री।                       


सुख-दुःखाची देवाण-घेवाण होऊन,  

आयुष्याची नौका पार करण्यासाठी, 

अशी, हवी गोड मैत्री।


जीवाभावाची, मौज, मजा, मस्ती, प्रेम,

जिव्हाळा हळुवार जपणारी,

अशी, हवी ही गोड मैत्री।


धगधगत्या उन्हात कल्पवृक्षासारखी,

थंडावा, विसावा, छत्रछाया देणारी,

अशी, हवी ही गोड मैत्री।


मनाला पंख लावून निरभ्र आकाशात,  

उंच उडून भरारी घेत मुक्त भिरभिरणारी,

अशी, हवी ही गोड मैत्री।


भिजत डुंबत समुद्राच्या लाटांत खेळत,

रमून जाणारी, जिचा अंत नाही अशी भासणारी,

अशी, हवी ही गोड मैत्री।


मऊ मुलायम फुलाप्रमाणे फुलणारी,

हृदयात हळुवार उमलणारी,

अशी, हवी ही गोड मैत्री।


रात्रीच्या मंदधुंद प्रकाशात चंद्र, चांदण्यांसवे स्वप्नात लाजत लुकलुकणारी,

अशी, हवी ही गोड मैत्री।


खरंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

जी हवीच, जिची गरज भासते,

असे गोड नातं म्हणजे मैत्री,

अशी हवी ही गोड मैत्रीll


Rate this content
Log in