पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
डोळ्यांची काळजाशी होड होती ती!
अंकुरली या मनातली मोड होती ती!
पऱ्या आसमानी किती असल्या जरी,
खऱ्या या दिलाची ओढ होती ती!
बेचव जिंदगीने चाखले जेव्हा तिला,
कळले तेव्हा मधापरी गोड होती ती!
तीची दरवळ सुगंधी अस्सल पुष्पावानी,
गुलाबासारखीच बिनतोड होती ती!
कवी : रमेश बुरबुरे, यवतमाळ मो न : ९७६७७०५१७०

