STORYMIRROR

Yogita Takatrao

Romance

4  

Yogita Takatrao

Romance

तुकडे मनाचे

तुकडे मनाचे

1 min
4.8K


तुकडे आहेत विखुरलेले माझ्या मनाचे

इकडे तिकडे सभोवतालि पसरलेले

उचलु कसे मी हात लावता दुरवर जाती

पाहु शकते फक्त उघड्या डोळयांनी

नाही घेता येत भरून ओंजळीतही

मी ही भरकटले त्या मनाच्या मागे

अनोळख्या जागी अनोळख्या वाटेने

कुठे,कधी,कसं पोहचू मी तिथपर्यन्त

सभोवतालि आसमंतापर्यन्त तेच दृश्य

परतिचा मार्गही अंधारलेला धूसर

तुटकं मन तुटक्या आशा घेऊन

कुठवर भटकत दिलासा देत राहु?

जोडेन मनाला खोटं बोलत राहु ?

काय करू कशाने गोळा करू ?

मन मानत नाही तुकडे एकत्र येत नाहीत

एकाच्या मागे जाते तर दुसरा निसटतोय

आणि पहिला तूकडा परत लांब जातोय

ठेचकाळत, जखमा वाढवत शोधत फिरतेय

काहितरी मिळतयं का चिकटवायला मनाला

बघतेय असहाय्य शून्य नजरेने त्याला

तिथल्या तिथे मन भरकटत बसलंय

बंदिस्त होऊन तेवढयाच आवारात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance