Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Classics Inspirational

3  

Yogita Takatrao

Classics Inspirational

बाईपण

बाईपण

1 min
26


बाईपण खरंच कठीण असतं...

म्हणून कुणाची कीव हवी नाहीये असं ,

पण एकेका बाईने ..दुसर्‍या बाईला आनंद द्यावा

म्हणून कदाचित हळदीकुंकू होत असावं !

प्रत्येकीचं दुःख वेगळं..संकट वेगळं..

तरी निभावतात हसण्यावारी सारं ,

आतली टोचणारी वेदना लपवत

वरचं हसू जराही नाही डगमगू देत !

लढ म्हणतात..एकमेकींना कुंकू लावून..

जसं की ती अंतर्मनातली आदिशक्ती ,

जागृत करून देतात...लढ तू मी ही गेलीये यातून !

निघशील या जाळ्यातून बाहेर नक्कीच..

बहरशील अंतर्बाह्य हरतऱ्हेने ,

उजळतील दाही दिशा तेजाने

जुळतील तुटकी समीकरणं !

फक्त तू खचून नको जाऊस..

कोणी नसतं गं...

हात सुद्धा असतात मोकळे ,

म्हणून हे वाण ओटीत देतेय

सर्वशक्तिमान भव !

हाच सदिच्छा मंत्र फुंकून 

तोपर्यंत तग धरून रहा..

तरंगत रहा या भावनाहीन समुद्रावर ,

नको बुडूस त्यात त्यागून प्राण

उलट प्राण पणाला लावून जरा जास्तच आनंदाने जग !Rate this content
Log in