Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Others

3  

Yogita Takatrao

Others

पुस्तक

पुस्तक

1 min
127


विद्या,ज्ञानाचा सागर...

पुस्तकाचे हर पान ,

कथा,कविता संग्रह 

त्याची आगळीच शान !


वाचकांचा आत्मा जणू..

जिवलग लेखकांना , 

छापलेले,आधुनिक 

प्रिय वाटते सर्वांना !


न्यारी गोष्ट विषयांची...

पुस्तकाच्या आशयाची ,

रूपरेखा खास अशी

सर नसते पैशांची !


आवडते सान,थोरा...

गोष्ट राम,कृष्ण यांची ,

रावणाची भक्ती,शक्ती

सीतेतल्या पावित्र्याची !


जीवनात विद्यार्थ्यांच्या..

अभ्यासाचा भाग खास ,

शाळेतला परिपाठ 

गुण उत्तमची आस !


एक माणूस घडावा...

त्यात सामर्थ्य एवढे ,

शिकवण देई धडा

काम महान केवढे !


बुद्धिमत्ता ,कौशल्याने...

वाढे चातुर्य काळाने ,

जग परिचित होते 

आकलन सर्वार्थाने !


ख्याती विश्वभर अशी...

सर्व शिक्षित तयाने ,

ज्ञानामृत पाजवून 

जादू केली पुस्तकाने !


Rate this content
Log in