Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Classics

3  

Yogita Takatrao

Classics

प्रवास

प्रवास

1 min
231

कठीण वाटा,अडचणी अमाप...

कधी.. कुठे चुकवणारा असतो खडतर मार्ग ,

खोल खड्डयात मध्येच ,अडकतो प्रवास 

प्रत्येकाचा सुरू तरीही,अविरत जीवन प्रवास !

पोहचायचे असते सर्वांना...सागर तीरापार 

खळाळत्या लाटांवर , लढवय्या होऊन स्वार, 

मधेच गोत्यात येते, धैर्याचे जहाज 

हार न मानता पोहावे लागते, जीव जपण्या फार !

कधी सामान्य माणसाचा, अध्यात्मिक प्रवास...

शिकवून जातं बरंच काही ,अनुभवाचं सार ,

जगण्याला समाधान अंतरा..अंतरावरची मज्जा 

तर होते कधी पाऊलवाटेवरल्या काट्याकुट्यांची सजा !

इतरांचा राजमार्ग पाहून घ्यावा थोडा धडा ..

मार्गक्रमण, भ्रमणा..वाटाड्या पुन्हा वेगवेगळा

यात्री येवो,यात्री जावो स्तब्ध असतो रस्ता 

प्रवास, प्रवासी राहतो बदलत 

बदलत नसतात खस्ता !

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics