Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

विद्येचा महासागर

विद्येचा महासागर

1 min
134


एकटेपणात कधी मित्र , कधी गुरु ....

तर कधी मार्गदर्शक असतं पुस्तक , 

योग्य माहितीचं दार 

ज्ञानाचा स्त्रोत असतं पुस्तक !

विविध विषयांवरचा खजिना ....

अमर्याद शब्दांचा ग्रंथ असतो पुस्तक , 

सकारात्मक विचार करायला भाग पाडत

हरलेल्या माणसाचं धैर्य बनतं पुस्तक !

काय वाईट ? काय चांगलं ?

याची जाणीव करून देतं पुस्तक 

सुचत नाही काही जेव्हा ,

दुबळ्याचा आधार होतं पुस्तक !

पानं..पानं जोडत जातं मनांना मने बांधून

जसं वाचनास तयार असतं 

आपल्याच भावनांचं पुस्तक 

चार ओळी त्यातल्या शिकवून जातात 

कसं जगायचं असतं जीवन !

छोटं असो मोठं असो किंवा असो ई - पुस्तक 

जो..जो नियमित वाचतो त्यास

लाभतं हो पुस्तक 

आकर्षक मुखपृष्ठ ,प्रस्तावना मोहवणारी...

परिकथेतील पात्रांसारखं सुंदर असतं पुस्तक !

वाचकांना गोडी लावत ,

लेखकांना उद्युक्त करतं पुस्तक 

अनंत मानसिक यातनांना दूर करत

विद्येचा महासागर ठरतं पुस्तक !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational