Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Drama Tragedy

3  

Yogita Takatrao

Drama Tragedy

ओळख

ओळख

1 min
17


ओळखीच्या नजरेतले अनोळखी भाव..

विचारू लागतात काय तुझी ओळख ?

जाणतेपणी..अजाणतेपणी वाटतं कधी..कधी

कोण आहे आरशासमोरची..ही ?

स्वतःच्याच मनाची ओळख पुसलेली..

कोण आहे ही ? सर्वांची ओळख ठेवणारी ,

स्वतः सुद्धा केला आहेस का प्रयत्न 

काळजातून हृदय जपण्याचं..आरश्यातल्या तिचं !

की इतरांसारखीच गेलीस विसरून लगेच...

अस्तित्वाचं तोंडदेखलं रुपडं पाहून..रोज..रोज ,

त्या स्वयंपाकघरात फोडणी देता..देता 

वाफ बनून उडून गेलेये आसक्ती स्वतः बद्दलची 

कपड्यांच्या घड्यात वाटली गेलीये आपुलकी

झटकून टाकली आहेत स्वप्नं कैक हवेत 

पण ..ठाऊक आहे कुठे आहे तुझी ओळख ?

त्या तुझ्या नयनांच्या कपारी मागच्या लपवलेल्या पाण्यात..

त्या हृदयात जेथे तळ ठोकून आहेत अजूनही काही सुप्त इच्छा , 

फक्त त्या वरचा तो पडदा काढून फेकला पाहिजे

पुन्हा आधीचीच ती ओळख मिळवण्यासाठी

कारण ती तर कपाळावर लावलेल्या टिकली सारखीच 

लावली की दिसते नाहीच लावली की ती लावल्याचं आभास जागवायचा !

खरंच..इतकी गहन आहे का तुझी नी माझी ओळख ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama