Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Tragedy Others

3  

Yogita Takatrao

Tragedy Others

तिच्या वेदना

तिच्या वेदना

1 min
20

बोथट झालेल्या वेदनेतून...

जेव्हा निघते शब्दांची धार ,

शब्दनशब्द कापत जातात

काळजातल्या संवेदनांची तार !

वरपांगी हसण्यात घालवलेले प्रसंग..

आत भावनांचा उद्रेक अन् जाळ ,

ओठांवर आलेले जीवघेणे शब्द पुन्हा

पुन्हा येतो..त्यांना अडवायचा काळ !

कुणी असो नसो सोबतीला..

उरून पुरतात आपल्यांचेच शब्द बाण ,

अन् पुन्हा सुरु होते हृदयात धडधड 

मेंदूने ती चेहर्‍यावर दाखवू नये शान !

Rate this content
Log in