अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे
अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे
सरत्या काळाची गती का मोजावी..
तारुण्य तुझे आज जर तुझ्या हाताशी ,
दुःखांची सरीता ओढ घेते कुठे बघ
समुद्र सदा तेथे आनंदाचा उपाशी !
ठाम रहायचे आहोत फक्त तेथे..
बदलून मार्ग संकट अवचित जाई ,
का कुणास ठाऊक कोणत्या वेळी
फुलेल कधीतरी सुखाची जुई !
झाकल्या असतील वाटा यशाच्या..
नको तडफडू उगा राई-राई ,
अजून स्वाभिमान जाज्वल्य आहे
उजळून निघेल अंधारलेली वनराई !
का माणसा तरी तुला विश्वास नाही..
कथेतली गोष्ट मनी पिंगा घाली ,
राजा लढतो शेवटपर्यंत कायम
नसतो त्यास कुणी रखवाला.. वाली !
जगावे कसे कुणास ठाऊक नाही..
आजन्म तरीही मग व्हावी त्राही..त्राही ,
प्रखर असावी जिद्द मनाची ,
नको उसन्या तळपत्या बिनधारी तलवारी !