Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Inspirational Others

3  

Yogita Takatrao

Inspirational Others

झळा

झळा

1 min
11

पुन्हा..पुन्हा जखमांच्या 

वेदनांना येती कळा ,

अन् खपलीवरच्या 

किती सोसाव्या मी झळा !

कित्येकदा केला पण..

फुलवेन मनी मळा ,

माती काळजाची सुकी

हाती फुटलेला फळा !

कधी गवसली नाही...

आनंदाची पेटी काही ,

काय कोरू हृदयात 

कुणा..कुणा देऊ ग्वाही !

वार आत लपलेले..

वर हास्य मुखावर ,

देखाव्यात चिंब सारे

ओझे भावनांचे घर !

माथ्यावर सूर्य उभा..

जाळे थर अपेक्षांचा ,

सोसवेना परी आता

उष्माघात आकांक्षांचा !

तग धरून तरीही..

तरु उभा धरणीत ,  

शोधे हास्याचे कारण

क्षणोक्षणी करणीत !

Rate this content
Log in