सूर्य मी दिगंताचा
सूर्य मी दिगंताचा
सूर्य मी दिगंताचा..
कसा विझवेल कुणी ?
नकारात्मक प्रभाव नक्कीच
माझ्या तेजोवलयात नाही !
अंत नाही सकारात्मकतेला..
जळून गेल्या दुःख वाती ,
प्रयत्न झाले हजारो तरीही
अस्तित्वाचे दिप माझ्याच हाती !
आशा-निराशेचे खेळ खेळायचे कुणाला ?
डोळे कधी अंधार पाहत नाहीत ,
भस्म होतात क्षणात षड् यंत्र सारे
सुखावते मज ती राख-रांगोळी !
रोजच भ्रमण करतात अवतीभोवती..
दुखावणारे विचार..क्षण सोबती..
काहिलीत करपून जाते लगेच पण
दिव्यत्वाच्या झळाळीत..निष्ठुर मती !
आधार मन पृथ्वीच्या जीवसृष्टीचा ..
जोपर्यंत अबाधित माझी दिनचर्या ,
नवनिर्माणात असेल वाटा
उत्साहाचा मारून फेरफटका !
अवकाशात कल्पनेच्या पोहचते..
नजर स्पष्ट जेथे दूरवर ,
अढळ स्थानात तटस्थपणे उभा
आत्मा माझा सर्व प्रवर्तक चराचर !
