दडपण
दडपण
येता जाता जीवनात या नुसते आहे दडपण
काळजातही खोलवर जखम करते आहे दडपण
निरर्थकच हे आहे सारे मी तर दोषी माझी
दुसर्यांसाठी जगले याचे रुतते आहे दडपण
मन आनंदी करण्यासाठी नकोच असते कारण
स्वानंदी ना रमणे जमले खुपते आहे दडपण
इच्छा जागी झाली आता हवा सुखाचा अनुभव
मेंदुतूनही होकाराचे घुमते आहे दडपण
हळूहळू या मनास माझ्या भासतेय जग सुंदर
साथ लाभता छंदाची मग विरते आहे दडपण
