STORYMIRROR

Manisha Awekar

Classics

3  

Manisha Awekar

Classics

गौराईंचा जागर

गौराईंचा जागर

1 min
292

वर्णसंख्या ८


आल्या आल्या गौरीबाई

बाई सोनपावलानं

आता हसू नाचू खेळू

करु या गं जागरण   //धृ//


करु आरास साजेशी

गोडधोड नैवेद्यासी

विडा ठेवू खावयासी

लवंगांनी बांधायासी 

कसे उमलले मन!!   (1)


गप्पागोष्टी तिजसंगे

सांग मनातले सारे

गोड गाणी तिजसवे

ऐकताना भान हरे

पिसापरि झाले मन!!   (2)


साथ झिम्मा फुगड्यास

भेंड्या लावी उखाण्यास

किती उखाणे सरस

लज्जा आरक्त गालास

जागू हसून खेळून     (3)


उद्या पाठवणी दिन

येती डोळे गं भरुन

लेक राही दिस तीन

वाहे गंगा डोळ्यांतून

रीत जगाची ही जाण   (4) 


पाही वळून वळून

मन घेई आवरुन

तीन दिसांचे माहेर

बहरले तन मन

मनी दाटे आठवण    (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics