विरह
विरह
गेलीस तू ठेवूनी मागे आठवणी सांग कुणा सांगू मी वेदनेची कहाणी
प्रत्येक वस्तुवरी होते कोरले तुझे नाव ही अक्षरे वाचूनीया हृदई पडती घाव
फुलवला होतास तू कसा संसारी बहर प्याल्यातल्या पाण्यातही दिसते तुझी तस्वीर
मला वाटते तुझे नाव हे उच्च व्हावे
लिहीत राहीन तुझ्याच नांवे हे पाझरते काव्ये
होता जीवनाचा सारीपाट व्यवस्थीत मांडला कैसा फासा हा दैवाचा उलटा पडला
नित्य असती तुझ्या डोळ्यात आसवांचे चांदणे माझे लोचन सांगती मज तुझे हे गऱ्हाणे
स्वप्न झाले उध्वस्त तिच भावनांची गती विरहास वरिले शेवटी मी जीवनात सदासंगती