आस या मनाची (सहाक्षरी)
आस या मनाची (सहाक्षरी)
निष्पर्ण वृक्ष ते
गळती पानाची
पालवी फुटते
वसंत ऋतूची
संपता गारवा
झळ ती उन्हाची
होई घालमेल
काहिली जीवाची
पळस फुलतो
माळ ती फुलाची
अंगी खांदी जणू
आरक्त ज्वालाची
लुकलुक पाहे
पापणी डोळ्याची
कुहू कुहू बोले
मैना ती रानाची
मोहर आंब्याचा
शोभा वावराची
फुले रोमरोमा
ओढ त्या गंधाची
वसंत बहरे
पालवी चैत्राची
शांत ती होतसे
आस या मनाची
