STORYMIRROR

Sanjay Jadhav

Classics

3  

Sanjay Jadhav

Classics

वाट

वाट

1 min
189

वाट पाहून थकले 

बरस रे मेघा लवकरी 

वृक्षवेली फार सुकले 

पाड जलधारा भूवरी 


मी जाहले चातक 

करते तुझ्या नामाचा 

ध्यास निरंतर रे चातक 

हो दास या भूमीचा 


दे साद आकाशी 

धावत ये तू वेगी 

मी मागते तुजपाशी 

धाव घेरे तू योगी 


मन माझे करी 

तुझी रे आळवणी 

निसर्गाचा तू सेवेकरी 

ठेव नजर पारसमणी 


पड रे पाण्या

पड तू लवकरी 

झाल्या डोळयांच्या कण्या 

दुःख तू माझे दूरकरी 


पाहून थकले मी 

अंत नकोस पाहू 

ठेवीन तुला मी 

शिंपल्यात राहू 


होता मोती तुझे 

पालटेल रूप 

आतुरले मन माझे 

पाहण्यास स्वरूप 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics