कवितेच्या गावी
कवितेच्या गावी
जायचंय मला गावी कवितेच्या
पाहायची आहे प्रतिभा कवींची
व्हायचे रममाण काव्यमैफलीत
आनंद लुटायच काव्य फुलांचं
कसं जावं कुणाला पुसावं
सांगेल का कुणी आहे गावं कोठे
विचारतो मी काव्य रसिकांना घ्या
मलाही सामील तुमच्या मैफिलीत
वाट कवितेची, ओढ कवितेची
आस कवितेची, गोडी कवितेची
होईल का पूरी माझी ही इच्छा
सांगेल का कुणी कवितेचं गावं
जिथे कमवलं अनेकांनी नाव
घेतलं त्यांना रसिकांनी डोक्यावर
आनंदी आनंद काव्याचा वाहतोय
मनसोक्त डुंबतात रसिक येथे
जायचंय मला गावी कवितेच्या
