आले गजानन
आले गजानन
वर्ण 12 यती 6 व्या अक्षरावर
आले गजानन, रुप मनोहर
येतसे दाटून, भक्तीस बहर //धृ//
विघ्नहर्ता तूच, तूच तारणारा
भक्ती पारखूनी, तूच पावणारा
डोळे लावूनीया, वाट पाहणार (1)
आनंदाचा कंद, देवा विनायका
मुखावरी स्मित, झळके तयाच्या
आज जाहलासे, मनी चिंतातुर
(2)
षोडषोपचारे, भक्त पूजा करी
दुर्वा फुले हार, अर्पणही करी
मोदक नैवेद्य, केलासे तयार (3)
थैमान घालते, संकट रोगाचे
जीवही घेतले, किती निष्पापांचे
करुणासागर, कृपा भक्तांवर (4)
भक्तीभावे केले, स्वागत आपुले
देवा गोड सर्व, मानूनीया घ्यावे
कृपावंत व्हावे, भोळ्या भक्तांवर (5)
