पांडुरंग हरी
पांडुरंग हरी
अवतरले या कलीयुगी साक्षात श्रीहरी
येऊनी केले वास्तव्य चंद्रभागेच्या तीरी
पुंडलिकासाठी ठेवूनी हात कटेवरी
देव माझा राहिला उभा विटेवरी
निवृत्तीनाथ तुकोबा नामदेव अन् ज्ञानेश्वर माऊली येती
दंग होऊनी सारे विठ्ठल रुक्मिणीचे ते मनमोहक रूप पाहती
वारकरी येती श्रद्धेने घेण्या विठ्ठल दर्शन
पालखी घेऊनी येती पंढरपुरी करीत भजन कीर्तन
विठू नामाचा करीत गजर
वारकरी होती पंढरीत हजर
मन माझे जाऊनी पोहोचले पंढरपुरी
ठाकला येऊनी पांडुरंग माझ्या सामोरी
