माणसाला देवपण लाभलं
माणसाला देवपण लाभलं
1 min
223
माणसातलं माणूसपण गेलं न निसर्गाचं देवपण लाभलं
जगावरी हे संकट उभं ठाकलं कोरोनाचं
मृत्यू तांडव माजला सगळे उपाय झाले व्यर्थ
देव अवतरला भूवरी कुठे डॉक्टरांच्या रुपात
तर कुठे त्या खाकी वर्दीतल्या पोलीसांच्या रुपात
माणूसपण गेलं माणसातलं न माणसाला देवपण लाभलं
जग पडलंय ठप्प न माणूस अडकलाय बंद दारा मागं
शहरं झाली रिकामी लोकं गावाकडे निघाली
अनवाणी चालत कुटुंबासह शेकडो मैल दूर
अन्न पाण्यावाचून हाल तरी घराची ओढ
मदतीचे हजारो हात आले पुढे गरिबांसाठी
धर्म जात विसरून झाले सगळे एकत्र
माणसातलं माणूसपण परतलं न माणसाला देवपण लाभलं
