घेऊनी आनंद दिवाळी आली
घेऊनी आनंद दिवाळी आली
दारी कंदीलं साऱ्यांच्या लागली
अन् सुंदर रांगोळी ही सजली
घेऊनी आनंद दिवाळी आली
फराळानी घरात ताटं सजली
खाऊन ते साऱ्यांची मनं तृप्त झाली
घेऊनी आनंद दिवाळी आली
दिवे लागले साऱ्यांच्या दारी
प्रकाशमय झाली दुनिया सारी
घेऊनी आनंद दिवाळी आली
आई लक्ष्मीचे घरी पूजन करूनी
गृहलक्ष्मीचा आदर अन् मान ठेवूनी
घेऊनी आनंद दिवाळी आली
भाऊबीजेला भावाला ओवाळूनी
बहिण भावाचे नाते घट्ट करूनी
घेऊनी आनंद दिवाळी आली
