आई
आई
1 min
167
आई म्हणजे प्रेमाचा अर्थ खरा
अन् मायेचा निर्मळ झरा
फुलासारखं असते आई आपल्या लेकरांना जपत
अन् रात्रंदिवस असते त्यांच्यासाठी खपत
चूकलं काही लेकरांच तर रागावते
अन् मायेनं डोक्यावरून हातही फिरवते
मानते आपला आनंद लेकरांच्या सुखात
अन् कायम असते सोबत त्यांच्या दुःखात
लेकरांसाठी देवाकडे मागते सारं काही
मात्र स्वतःसाठी काही मागतच नाही
आईच असते लेकरांवर करणारी निःस्वार्थ माया
अन् संकटात लेकरांच्या बनते त्यांची छाया
असते ती लेकरांचा पहिला गुरू
आई आहे देव अन् एक कल्पतरू
