स्वामी समर्थ
स्वामी समर्थ
प्रकटलासी कर्दळी वनी
जग उद्धारासाठी स्वामी
निराकार निर्गुण दत्तावतारी
सदैव कृपा असे भक्तांवरी
स्वामींची होता कृपादृष्टी
होईल सुखसंपत्तीची वृष्टी
ज्यांचे कोणी नाही या जगी
बनशील त्यांचे बाप अन् आई
लेकरांसाठी परम उदार
मायेचा अथांग सागर
गोड न लागे मज घास
लागता स्वामी नामाचा ध्यास
हव्या त्या रूपात देशी दर्शन
मज काशी म्हणजे तुमचे चरण
