माय मराठी
माय मराठी
1 min
214
आपुली मराठी आहे अमृताहूनी गोड
नाही जगात तिला कशाची तोड
स्वतःस भाग्यवान मानते मी
मज लाभली मातृभाषा ही
मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान
मज आहे मराठी असल्याचा अभिमान
सौंदर्यवान अन् सर्वगुणसंपन्न असणारी
असे ती संस्कार अन् परंपरा जपणारी
इतिहास अन् साहित्यांनी बहरलेली
आहे मराठी अलंकारांनी नटलेली
माझी मराठी भाषा जणू ज्ञानगंगा
तिच्या एवढी महती कोणाची सांगा
ऐसे माझे थोर पुण्य म्हणोनी
मज माय लाभली मराठी
मराठीचं वैभव कायम अबाधित राहिल
हृदयात साऱ्यांच्या मराठी संस्कृती वर्चस्व करेल
