जीवन
जीवन
1 min
249
चाललंय काय कोणाच्या आयुष्यात
असतं ज्याचं त्यालाच माहित
असतो करत तो किती तरी सहन
तर्क पण लावू नाही शकत आपण
वाटत प्रत्येकाला आपलीच परिस्थिती मोठी
अन् दुसऱ्यांची वाटत असते खूपच छोटी
करावं काय समजतच नाही या परिस्थितीत
असतो आपणच द्विधा मनःस्थितीत
परिस्थितीशी या लढायचं तरी किती
वाटू लागते कधी कधी आपल्यालाच भिती
नक्की लढायचं तरी आहे कोणाशी
या वाईट परिस्थितीशी की लोकांशी
मानत असतो आपण ज्यांना आपले
कळतंच नाही कधी होतात ते परके
घेत नाही कधीच कोणी समजून
जावं कसं आपण सारं काही विसरून
सांगावं तरी कोणाला सगळं
अन् करावं तरी कुठे मन मोकळं
