स्वप्नपूर्ती
स्वप्नपूर्ती
किती स्वप्नांच्या मागे पळायचं
त्यांनाही आपल्या मागं पळवू या ना
किती स्वप्न पूर्ण व्हायची वाट बघायची
त्यांनाही आपली वाट बघायला लावू या ना
कोण काय बोलेल याचा विचार का करायचा
आपल्याला हवं तसं करू या ना
कशाला कोणाची परवा करायची
आपण आपलं ध्येय पूर्ण करू या ना
