लेक
लेक
लेक म्हणजे धरतीची जननी!
ऐका तिची दारुण कहाणी!!
हुंड्याच्या धाकाने जन्मआधीच घेतला जातो तिचा बळी!
हिच प्रथा आहे सकळी!!
लेक ही कुणाची तरी बहिण किंवा अर्धांगिनी असते!
अथवा मायेची ऊब देणारी ती आई असते!!
मूल होण्यासाठी पूर्ण परिवार किती नवस करतात!
लेक जन्माला आली म्हणून का हो तुम्ही माझा जीव घेतात!!
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा!
हुंड्याचा पैसा वाचेल सारा!!
लेकच नाही राहीली जगात तर, पप्पा तुमचा मुलगा राहील कुवारा!
जरा विचार करा!!
मुलीला असते माया!
कर्तव्यदक्ष असते तिची छाया!!
माहेर सासरची ती लक्ष्मी!
तिची गरज भासते क्षणोक्षणी!!
मुलगा आणि मुलीला जन्म देणारी ही आईच असते!
आणि आई ही कुणाची तरी लेक असते!!
जगातल्या मातापित्यानो करा एक निर्धार!
मुलगी वाचवून द्या या मानवजातीला आधार!!
