STORYMIRROR

sarika k Aiwale

Classics

3  

sarika k Aiwale

Classics

सांग ना दर्पणा..

सांग ना दर्पणा..

1 min
290

भाव अनामिक ओढ मनास ती

सदा कानी बोल असे का सोबती

सांग ना दर्पणा कोण ती नजर

भावे तुला अशी की भुलतो भ्रमर

मन तया संगती भासते जगा वेगळे

दर्पणातही रुप हे दावते का आगळे

विश्वास तो ऐहिक मनाचा घेता ताबा

हसरे भाव खुलता जगण्यास शोभा

आरसा हा दावतो निखळ सत्य सदा

परी ना दावता येते अंतरी ची ती अदा

अंतर मनाचे सौदर्य दावतो जो सारा

तोच अत्मिक विश्वासाचा आरसा खरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics