त्या दिवशी
त्या दिवशी
त्या दिवशी
पापणीत जपलेल स्वप्न मनात वसलेल गाव
नजरेत भरलेल आभाळ क्षणात बदलता भाव
सारेच सहज गेले कसं नजरेसमोरून ओझरून
अजुनही ति मेघ दाटल्या मनाला घेते सावरून
क्षण ना थांबले कधी ओंजळीत अश्रू मोहरले
आठवणींच एक पान त्या दिवशी मनात रुजलेल..
हळूच एका वळणावर तिचे मन स्तब्ध झाले.. सारे काही क्षणिक होते पण त्याचा परिणाम तिच्या मनावर कुठेतरी खोल झाला होता...
त्या दिवशी मन त्या पावसाच्या धारा अन सोबतीला....
त्या दिवशी....
मनाच्या कोपर्यात चित्र कोरलेले
पावसाच्या सरी झेलत ओंजळीत
डोंगराच्या कुशीत एक गाव छोटेसे
ढगांची चादर ओढत गाढ झोपलेले
शांत निवांत वारा मात्र त्याला छेडत
असाच एका क्षणी मनी तळी गुंजारव
बोलघेवडा तो पाऊस तिलाच छेडत
निरागस पहाट होती मनीचा ठाव घेत
वाट धुसर होती दवात सजलेली
अंधूक आस मना कोवळाली रुजलेली
नजरेत अशी ति सकाळ जणू कोरलेली
एक अस गाव जिथ तिच मन रमलेल
कालची संध्या अन आजची ति पहाट
आयुष्यभर आठवणी बनून राहीलेले
क्षण मनात असेकाही अजूनही रुतलेले...
मनाच्या कोपर्यात चित्र कोरलेले
पावसाच्या सरी झेलत ओंजळीत
डोंगराच्या कुशीत एक गाव छोटेसे
ढगांची चादर ओढत गाढ झोपलेले
@Sari
©️Sarika k Aiwale

