डायरीतल एक पान...
डायरीतल एक पान...
जगायचं आहे तरी किती
जगायचं आहे तरी किती
मरण सुखात्न जगते आहे
विरहात जणू कोणी ते
क्षण सुखाचे आठवते आहे
शब्द पालवी ती बहरते
क्षण ते सुखात न्हाते
मन असे का हरवतेय
वाट जीवनी ती बदलते
ऋतुपर्ण जीवनी चालतेय
घटना ग्रहगोल असती तरी
भेटते ती पाऊलखुण जुनी
पुन्हा पुन्हा का भासे नवी
आपणच जपली जी नाती
धाग्यात माळले मी श्वास ते
उगा होतात क्षणभासिक जे
जीव उगा असा का आतुरतो
जगण्यसाठी मरण ही आसुसते
मरणाच्या दारी जगण मागते
कळतच नाही जगण जरुरी का असतं
जीव असा उधार का वागतो
मृत्यू सामोर असा येता
क्षण मोती जणू वेचतो
रात्र एकली ती गहरी
उष:कालास आसुसते
रंग जीवनी असे बहरता
रुक्ष उन्हात सावली जळते
मरणाच्या दारात जीव जाता
इच्छा जगण्याची का अधीर होते
✍@ sari
सारिका ऐवले
