पिल्ले जरी तुम्ही श्वानाची
पिल्ले जरी तुम्ही श्वानाची
जरा दबकत जरा घाबरत
ईवलेसे ते पाऊल टाकत
ईवलेसे डोळे मिचकावत
अंगणात होतास गुरकावत
कधी आलास माझ्या घरात
कधी शिरकाव केलास मनात
एक अनामिक नात आपल्यात
मन हेलकावे घेत स्मरणात
तुझ्या पिटुकल्या पावलांची
ऐटीत ताल सुर हाक मारत
कानास लागता चाहुल क्षणात
भाव बोबडे बोलता डोळ्यात
दोन जिवलग माझया जगात
मानवासम न वागणे काहीच
भाषाही आमची न समजत
हावभाव ते लळा लावून जात
एकएक हाक आजही कायम
उगाच ना भावुक होते मनात
पिल्ले श्वानाची असूनही त्यात
गोडस भावंडं जपली मनात
सोबतीस तुमच्या हसू मुखात
सतत ताई बोलण्याचा अटटहास
वाटे हाक देत उभा अंगणात
फिरून येशील माझ्या जगात
सनी विकी फक्त माझी भावंड
कुतूहल नेमही त्यांचया नजरेत
शत्रूची चाहुल लागता दारात
वाघावाणी चाल करून जात
आज काळाच्या पडद्याआड
छवी तशीच अजूनी मनात
रक्षाबंधन आले काही दिवसात
पाठच्या भावापरी मान घेतलात
भावुक होतील मन हे हळवे
भास कधी होणार ना सत्य
मन उगाच आठवणीत हसत
एक तुमच नसणं डोळ्यात तरळतं
@Sari
©️Sarika k Aiwale
